एआयसी-एमआयटी-एडीटीच्या स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्रामचे यश
पुणे: शालेय विद्यार्थ्यांमधील उद्यमशीलता आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील अटल इनक्युबेशन सेंटर (एआईसी) द्वारे अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राम (एटीएल-एसआईपी) राबविला जात असून, चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र तथा छत्तीसगढमधील ९ शाळांचे १४ प्रकल्प मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. अंतिम मंजुरी नंतर सहभागी चमू आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह डसॉल्ट सिस्टम्स यांच्या साह्याने त्यांचे प्रकल्प विकसित करू शकणार आहेत.
एआईसी -एमआईटी एडीटी इनक्यूबेटर फोरमच्या माध्यमातून ९ शाळांमधील १५ संघांची निवड अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राममध्ये करण्यात आली. या सर्व संघाचे अंतिम ऑनलाइन प्रकल्प सादरीकरण आणि परीक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. तत्पूर्वी, निवड झालेल्या शालेय चमूसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग, ऑनलाईन तसेच ऑफलाईन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना त्यांच्या बीज कल्पनांमधुन उद्यमशील स्टार्टअप तयार करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ऑनलाइन सादरीकरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एआयसी-एमआयटीएडीटी इनक्यूबेटर फोरमचे व्यवस्थापक कार्यक्रम नीलेश पांडव होते; तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिषेक राठी आणि मनोज देशपांडे यांनी काम केले. प्रख्यात महिला उद्योजिका आणि पुणे येथील फूड मँक कन्सल्टंट्सच्या संचालिका भाग्यश्री म्हात्रे, सायंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ विपणन अभियंता विजय वाढणे, मास एंटरप्रायझेस, पुणेचे संचालक मंगेश चव्हाण आणि एमआईटी विद्यापीठाच्या आयटी विभागाचे अविनाश चौधरी यांनी परिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यमापन केले.
यापूर्वी २०२२-२३ मध्ये एमआईटी एडीटी विद्यापीठाच्या बायोइंजिनियरिंग विभागाच्या मदतीने शासकीय विद्यालय, बिलासपूर द्वारे तयार केलेल्या “फूट रिलॅक्सको” प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक सह फ्रान्स भेटीची संधी मिळाली. त्याचप्रमाणे, गत वर्षी आर सी पटेल स्कूल, पुणेच्या टीमला टाटा फाउंडेशनच्या प्रख्यात डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअरद्वारे त्यांचा प्रकल्प विकसित करण्याची संधी मिळाली होती.
विविध विषयांवर प्रकल्प
अपघात प्रतिबंधक यंत्रणा (स्मार्ट रोड), जलकुंभापासून सक्रिय चारकोल निर्मिती, आपत्ती निर्देशक, पथ विक्रेत्यांसाठी स्ट्रीट मार्ट, मानसिक चार्ट बोर्ड, एलपीजी गॅस लीक शील्ड, डायबेलाझल, स्वयंचलित कृषी उपकरणे इत्यादी विषयांवर प्रकल्प सादर केले. यासाठी एआईसी-एमआयटी एडीटीसह त्यांच्या विज्ञान शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले.