मुंबई, 5 फेब्रुवारी 2025: करियरमध्ये होत जाणारे नवनवीन बदल आणि वाढते आयुर्मान यांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक युगातील सध्या नोकरी, व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना अशा योजना हव्या असतात ज्या पारंपरिक सेवानिवृत्ती नियोजनाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या गरजा, इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकतील. FIRE (फायनान्शियल इंडिपेन्डन्स रिटायर अर्ली) पिढी असो, महत्त्वाकांक्षी उद्योजक असोत किंवा करियरमध्ये बदल करू इच्छिणाऱ्या व्यक्ती असोत, रियरमेंट प्लॅनर्स एक प्रभावी रिटायरमेंट कॉर्पस सुरक्षित करण्याच्या स्मार्ट पद्धतींना प्राधान्य देत आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी (GBD) २०२१ मधील अनुमानांनुसार, २०५० पर्यंत भारतीय पुरुष आणि महिलांचे आयुर्मान सरासरी ४ ते ५ वर्षांनी वाढेल, म्हणजेच ते सरासरी ७६ ते ८० वर्षे वयापर्यंत जिवंत राहतील. त्यामुळेच आजच्या काळात नवीन, लवचिक आणि विकासोन्मुख आर्थिक योजनांची आवश्यकता पहिल्यापेक्षा खूप जास्त वाढली आहे.
ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन लॉन्च केला आहे. हा एक नवीन युनिट-लिंक्ड पेन्शन प्लॅन (ULIP) आहे आणि नव्या काळातील रिटायरमेंट आवश्यकतांनुसार डिझाईन करण्यात आला आहे. दुसरा स्वतंत्र उत्पन्न स्रोत तयार करण्यापासून सेवानिवृत्ती काळासाठीची बचत सुरक्षित ठेवण्यापर्यंत, ही योजना डिजिटल सॅव्ही आणि आर्थिक सुरक्षा व स्वातंत्र्य हव्या असणाऱ्या आधुनिक प्रोफेशनल्सच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करते.
आजच्या काळात स्मार्ट रिटायरमेंट प्लॅनिंग महत्त्वाची का आहे:
- वाढते आयुर्मान: भारतीय पुरुष आणि महिलांचे आयुर्मान ४ ते ५ वर्षांनी वाढेल, म्हणजेच ते ७६ ते ८० वर्षे वयापर्यंत जिवंत राहतील अशी अपेक्षा आहे (जीबीडी स्टडी २०२१), सेवानिवृत्त लोकांना दीर्घकाळपर्यंत स्थिर उत्पन्नाची आवश्यकता असणार आहे.
- डेमॉग्राफिक्समध्ये बदल: भारतातील लोकसंख्येमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त मिलेनियल्स (४४० मिलियन) आहेत, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना वाढलेले आयुर्मान आणि पारंपरिक पेन्शन लाभांची कमतरता या दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल.
- उद्योजक मानसिकता: करियरमध्ये बदल करण्याकडे कल वाढत आहे, जास्तीत जास्त लोक आपले स्वतःचे स्टार्टअप व्यवसाय सुरु करत आहेत. असे करत असताना ते आपल्या सेवानिवृत्तीसंबंधी गरजा देखील पूर्ण करू इच्छितात.
- जीवनशैलीशी संबंधित इच्छाआकांक्षा: आधुनिक सेवानिवृत्त व्यक्तींची इच्छा असते की सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांची जीवनशैली पूर्वीप्रमाणे कायम राखली जावी. त्यांच्यासाठी मार्केट-लिंक्ड विकासाच्या संधी आणि लवचिक योजना आवश्यक असतात. उदाहरणार्थ, अनेक सेवानिवृत्त व्यक्तींची इच्छा असते, लक्झरी कार खरेदी करावी किंवा कार अपग्रेड करावी किंवा परदेशात सुट्टीसाठी जावे, ज्या गोष्टी ते काम करत असताना करत होते त्याच त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील करत राहायच्या असतात. त्यासाठी स्मार्ट आर्थिक योजना आणि गुंतवणुकीची गरज असते, जेणेकरून त्यांच्यासाठी हे सर्व संभव होऊ शकेल.
- जीवनावश्यक खर्च वाढत आहेत: वैद्यकीय महागाईचा दर १०% च्या आसपास आहे आणि जीवनावश्यक खर्च वाढत आहेत. सेवानिवृत्ती योजनांमध्ये विकासाच्या शक्यतांबरोबरीनेच नव्याने निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या तरतुदींची देखील आवश्यकता आहे.
१. स्मार्ट पेन्शन सिक्युअर: फंड-स्विचिंगमध्ये लवचिकता आणि मजबूत डेथ बेनिफिटसह मार्केट-लिंक्ड गुंतवणुकीवर केंद्रित.
२. स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लस: पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास योजनेची सुरक्षा कायम मिळत राहावी यासाठी यामध्ये प्रीमियममध्ये सूट लाभ देखील आहे.
योजनेची लवचिकता
- योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा: ३५ ते ७५ वर्षे (पेमेंट कालावधीप्रमाणे वेगवेगळी आहे)
- वेस्टिंग वय: ४५ व्या वर्षापासून सुरु होते, ज्यामध्ये सिंगल/लिमिटेड पेसाठी जास्तीत जास्त ८५ वर्षे आणि रेग्युलर पेसाठी ७५ वर्ष आहे.
- पॉलिसी कालावधी: १० वर्षांपासून जास्तीत जास्त वेस्टिंग वयापर्यंत.
टाटा एआयएची स्मार्ट पेन्शन सिक्युअर योजना मिलेनियल्सना हे अंतर दूर करण्यात आणि निवृत्तीनंतरचे जीवन चिंतामुक्त करण्यात सक्षम बनवते.
पॉलिसीबझार हे कंपोझिट ब्रोकर म्हणून नोंदणीकृत आहे. नोंदणी क्रमांक ७४२, नोंदणी कोड क्रमांक IRDA/DB 797/19, 09/06/2027 पर्यंत वैध, परवाना श्रेणी- कंपोझिट ब्रोकर
फोनपे इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड IRDAI डायरेक्ट ब्रोकर (लाइफ आणि जनरल) रजिस्टर ७६६ आणि ब्रोकर रजिस्ट्रेशन कोड IRDA/DB 822/20 10/08/2027 पर्यंत वैध आहे.
टाटा फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड [TFPL] ही टाटा डिजिटलची उपकंपनी आहे जी टाटा नेउ ऍपवर विमा उत्पादने ऑफर करते. टाटा फिनटेक हा टाटा एआयएचा कॉर्पोरेट एजंट आहे. नोंदणी क्रमांक – CA0818.