निलंबनानंतर शिवराज राक्षे म्हणाला – पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा

Date:

अहिल्यानगरमध्ये रविवारी 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत पैलवान पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला चितपट केले. या सामन्यात 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षेने पंचांशी वाद घातला. तसेच एका पंचाला लाथ देखील मारली. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेने त्याला तीन वर्षांसाठी निलंबित केले. या निलंबनानंतर शिवराज राक्षेने प्रतिक्रिया दिली. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा, असे तो म्हणाला.

सर्वकाही चुकीचे झाले असून सर्वांनी ते पाहिले आहे. कुस्तीचा व्हिडिओ तपासण्याची आम्ही विनंती केली होती. व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या, असे म्हणालो होतो. थर्ड अम्पायरला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली. दोन्ही खांदे टेकले असतील तर आम्ही हार मानायला तयार आहोत. कुस्तीत हार जीत होत असते. पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचे नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे, असे शिवराज राक्षे म्हणाला.

शिवराज पुढे बोलताना म्हणाला की, मी वारंवार हेच सांगतो होतो की, रिव्ह्यु दाखवा. त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर घेतलेला निर्णय मान्य आहे. पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केले नाही. मला शिविगाळ केली. म्हणून मला टोकाचे पाऊल उचलावे लागले.

एखाद्या पैलवानावर अन्याय होत असेल तर तो गप्प बसणार नाही. तुम्ही नंतर मान्य करता की पंचांकडून चुकी झाली आहे. मग त्या पोझिशनचे पॉइंट देऊन पुढे खेळ सुरू ठेवला पाहिजे होता. पंचांनी स्वतः मान्य केलंय की चुकी झाली आहे. त्यामुळे पंचांवरही आक्षेप घेतला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्यावेळी काळजी घेतील, असेही शिवराज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.

दरम्यान, पंचांनी माझ्या मुलाला आदल्या दिवशी शिवीगाळ केली होती. माझ्या मुलावर जर निलंबनाची कारवाई केली, तर मग पंचांवर कारवाई का नाही? पंचांना शिक्षा का केली जात नाही? असा सवालही त्याच्या आईने केला. आमचा मुलगा गरीब घरातला आहे. पंचांनी रिप्ले का दाखवला नाही? चूकही मान्य केली पण ती नंतर मान्य केली. माझ्या मुलाचे इतकेच म्हणणे होते की रिप्ले दाखवा. तो दाखवला नाही. पंचांनी शिवीगाळ करणे किती बरोबर आहे? तीन वर्षे जर त्याचे निलंबन केले आहे, तर मग पंचावर कारवाई केली पाहिजे, त्यांचीही चूक आहेच. मागच्या वर्षीही शिवराज राक्षेवर अन्यायच करण्यात आला. हे नेहमी घडत आले आहे, असे शिवराजच्या आई म्हणाल्या.

उपांत्य फेरीनंतर अंतिम सामन्यातही गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. यावेळी महेंद्र गायकवाडने देखील पंचांबरोबर वाद घातला. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने त्यालाही तीन वर्षांसाठी निलंबित केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...