63-वर्षीय रुग्णाला श्रवणशक्ती परत मिळवून दिली
· ज्युपिटर हॉस्पिटल येथील अनुभवी ENT सर्जन्सनी केलेल्या या प्रक्रियेत चेहऱ्याच्या मज्जातंतूंसह महत्त्वाच्या संरचना जपण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विच्छेदन करणे आवश्यक होते
पुणे,: एका अत्यंत आव्हानात्मक ENT शस्त्रक्रियेच्या प्रकरणात शहरातील अत्यंत अनुभवी सर्जन्सनी 8 तासांची अत्यंत गुंतगुंतीची शस्त्रक्रिया करून एक दुर्मिळ स्कल बेस ट्यूमर काढला आणि एका 63 वर्षीय रुग्णाची श्रवणशक्ती त्याला परत मिळवून दिली. हा रुग्ण पल्सेटाइल टिनायटसने पीडित होता, ज्यामध्ये कानात निरंतर एक आवाज येतो, जो नाडीच्या ठोक्यांशी जुळणारा असतो; तसेच कानात जड-जड वाटते. कानात वाजणाऱ्या या ठोक्यांमुळे रुग्णाची स्थिती शस्त्रक्रियेपूर्वी अत्यंत क्लेशदायक होती.
अशी आरोग्य स्थिती असलेल्या रुग्णाला ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. MRI आणि CT स्कॅनमध्ये दिसून आले की, त्याच्या जग्युलर फोरामेनमध्ये 4.5 सेंमी आकाराचा एक दुर्मिळ ट्यूमर होता, जो कानाच्या मध्यापासून मानेच्या वरील भागापर्यंत पसरला होता. त्या ट्यूमरचे आकारमान आणि स्थान पाहता, हे प्रकरण ज्युपिटर हॉस्पिटलमधील अत्यंत कुशल ENT सर्जन्सकडे पाठवणियात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. (क) इंदरदीप सिंह यांनी केली, तर डॉ. दुष्यंत खेडीकर यांनी त्यांना साहाय्य केले. या प्रक्रियेत चेहऱ्याच्या मज्जातंतूंसह महत्त्वाच्या संरचना जपण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विच्छेदन करणे आवश्यक होते तसेच ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकणे देखील तितकेच महत्त्वाचे होते. विस्तारित हायपोटिम्पेनम दृष्टिकोनासह चेहऱ्याच्या मज्जातंतूच्या वर आणि खालील बाह्य बोनी कॅनल हटविण्यात आली.
हे शस्त्रक्रियेचे प्रकरण आव्हानात्मक आणि तितकेच आगळेवेगळेही होते, मूलतः ट्यूमरच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे आणि त्याच्या नाजुक स्थानामुळे.
या प्रकरणाच्या जटिलतेची पुष्टी करत डॉ. (कर्नल) इंदरदीप सिंह म्हणाले, “जग्युलर फोरामेनमध्ये वाढलेला हा ट्यूमर कानाच्या मध्यापासून मानेच्या खालील भागापर्यंत पसरला होता. त्यामुळे त्याच्या शस्त्रक्रियेसाठी बारकाईने आयोजन आणि अंमलबजावणी दोन्ही आवश्यक होते. या भागात क्रॅनियल नसा आणि प्रमुख रक्तवाहिन्यांसहित महत्त्वाच्या रचना गच्च भरलेल्या असतात. हा ट्यूमर चेहऱ्याच्या मज्जातंतूच्या आणि 12 व्या क्रॅनियल नसेच्या अत्यंत जवळ असल्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान नसांना नुकसान होण्याचा मोठा धोका असतो. शिवाय, ट्यूमरमध्येही खूप रक्तवाहिन्या असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव होण्याचा मोठा धोका होता त्यामुळे या समस्त प्रक्रियेदरम्यान रक्तस्राव व्यवस्थापन ही एक चिंतेची बाब होती.”
या प्रक्रियेसाठी विविध शाखांच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. ENT सर्जन्सनी शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. काही अनपेक्षित गुंतागुंत उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी एक कार्डिओथोरॅसिस व्हास्क्युलर सर्जन होता. शस्त्रक्रिया करणाऱ्या टीमने दुहेरी दृष्टिकोन अंगिकारला. ट्यूमरपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तो काढून टाकण्यासाठी एकाचवेळी कानाच्या मध्यातून आणि मास्टॉइडमधून विच्छेदन केले.
या शस्त्रक्रियेतील वेगळेपण त्यात करण्यात आलेल्या टेकनिक्सच्या नावीन्यपूर्ण वापरात होते, ज्याच्यामुळे रक्त देण्याची गरज न पडता ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकता आला.
डॉ. सिंह म्हणाले, “रक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी आम्ही ट्यूमर कॅप्सूलसह मायक्रो बायपोलर कॉटरीचा उपयोग केला. शिवाय, प्रक्रियेदरम्यान आम्ही आंतरिक जग्युलर नस आणि सिग्मॉईड साइनस बंद केले, ज्यामुळे रक्तस्राव आणखीन कमी झाला.”
ते पुढे म्हणाले, “या शस्त्रक्रियेचा एक अत्यंत समाधानकारक परिणाम हा होता की कानात ठोक्यांचा आवाज येणे आणि कान जड वाटणे यांसारखी रुग्णाची लक्षणे तत्काळ अदृश्य झाली. ट्यूमर संपूर्णपणे काढून टाकताना आम्ही रुग्णाची श्रवणशक्ती वाचवू शकलो याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो.”
या प्रकरणातून नेमकेपणा आणि टीमवर्क यांचे महत्त्व अधोरेखित झाले. महत्त्वाच्या संरचनांना धक्का न लावता, गुंतागुंत टाळून सर्जन्सनी कोणतीही न्यूरोलॉजिकल हानी होऊ न देता उत्कृष्ट परिणाम साधले. रुग्णाला त्याची श्रवणशक्ती परत मिळाल्याबद्दल त्या रुग्णाच्या कुटुंबियांनी ENT सर्जन्स आणि ज्युपिटर हॉस्पिटल, पुण्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.