राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी ) आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी ) यांनी एकत्र येत 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला.
ध्वजारोहण समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यात दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग पहायला मिळाला. देशाप्रति एकात्मता आणि समर्पणाच्या भावनेचा गौरव करून राष्ट्रगीत गायनासह राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
ध्वजारोहणानंतर, एनएफडीसी आणि सीबीएफसीच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता पंधरवडा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. उपक्रमाचा एक भाग म्हणून, न वापरलेल्या फाइल्स आणि दस्तावेजांचे पद्धतशीरपणे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्या हटवण्यात आल्या. यातून कामाच्या ठिकाणी स्वच्छता, शाश्वतता आणि कार्यक्षम संसाधन व्यवस्थापनाप्रति त्यांची वचनबद्धता अधिक बळकट झाली.
या सहकार्यात्मक प्रयत्नाने स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना अनुरूप स्वच्छ आणि संघटित पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्वच्छ भारतासाठी प्रत्येक नागरिकाच्या सामायिक जबाबदारीवर भर दिला.
सामूहिक अभिमानाच्या भावनेने आणि राष्ट्राच्या प्रगतीत सकारात्मकपणे योगदान देण्याच्या निर्धाराने या कार्यक्रमाची सांगता झाली.