पुणे-हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ही पुणे जिल्ह्यातील सत्तर वर्षे जुनी प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले.
HA कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा नुकतीच प्राप्त झाल्यानंतर कंपनीत त्यांची भेट आयोजित करण्यात आलेली होती.
यादरम्यान व्यवस्थापकीय संचालक श्रीमती नीरजा सराफ व अन्य प्रमुखांची बैठक घेऊन कंपनीच्या व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घेण्यात आली व त्यानंतर कर्मचारी वर्गाच्या जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले.
मा. केंद्रीय मंत्री श्री जगत् प्रसाद नड्डा जी (रसायन व खते मंत्रालय) यांची भेट घेऊन औषध निर्मिती संबंधीच्या विविध प्रश्नांबाबत तसेच कर्मचाऱ्यांची थकीत बाकी व प्रलंबित पगार वाढ याबाबत चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी मा. केंद्रीय मंत्री जे पी.नड्डा यांच्या समवेत कंपनीच्या MD नीरजा सराफ, कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित घेऊन बैठकीचे आयोजन करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमास भारतीय मजदूर संघाचे श्री. बाळासाहेबजी भुजबळ, सरचिटणीस श्री. विजय पाटील, बाळासाहेब जाधव, धनंजय देशमुख, अनिल ढुमणे, गोपीनाथ शेळके, राजेंद्र जाधव, पंडितराव पवार, उमेश कुलकर्णी, अनिल चांदणे, रवींद्र चव्हाण, सुजाता तांबे, कैलास शिंदे, शिवप्रसाद करमकर, विनायक बोरखडे, दीपक कदम, दिलीप खेडेकर, राजेंद्र सावंत, अनिल गाडे व अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.