उमेदवारांना जाब विचारण्याचे साधन
पुणे : निवडणूका आल्या कि उमेदवारांनी दिलेल्या विविध आश्वासनांच्या पत्रकांचा ढीग मतदारांच्या घरात जमा होऊ लागतो. निवडणूक होण्यापूर्वीच हि पत्रके केराच्या टोपलीत जाऊन पडतात आणि निवडणूकीनंतर जनतेला दिलेली आश्वासनेही हवेत विरून जातात. त्यामुळे जनताही नेत्यांच्या आश्वासनांकडे फार गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी लोकायत व सोशलिस्ट पार्टी (इंडिया) च्या उमेदवारांनी आपल्या प्रभागात प्रॉमिस कार्ड चे वाटप करण्यास सुरवात केली आहे. या प्रॉमिस कार्डच्या माध्यमातून उमेदवारांना जाब विचारण्याचे साधन हाती आल्याने जनतेकडूनही या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.