महाराष्ट्र सरकारला 24 तासांत अहवाल सादर करण्याचे लोकसभा अध्यक्षांचे आदेश

Date:

मुंबई -दलित असल्याने आपल्याला पाणी दिले जात नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावबाबत तक्रार केली होती .तातडीने या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल 24 तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.

‘मातोश्री’ निवासस्थानावर जाऊन हनुमान पठणाचा इरादा केलेल्या राणा दांपत्याविरोधात थेट देशद्रोहाचे कलम 124 -अ लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नवनीत राणांच्या पत्रातील ठळक मुद्दे

  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ‘हिंदुत्व’ तत्त्वांपासून पूर्णपणे भटकली आहे. त्यांनी जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली.
  • शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाईन आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर ‘हनुमान चालिसा’ पाठ करेन, अशी घोषणा केली होती. कोणताही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा हेतू नव्हता. खरे तर मी मुख्यमंत्र्यांना ‘हनुमान चालिसा’च्या जपासाठी आमंत्रित केले होते. माझी ती कृती मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हती, याचा मी पुनरुच्चार करते.
  • माझ्या कामामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते हे लक्षात घेऊन, मी जाहीरपणे यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि जाहीर केले की मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला भेट देणार नाही. पण, त्यानंतरही मला आणि माझ्या पतीला घरात कैद केले.”
  • मला 23.04.2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मी पोलीस ठाण्यात रात्र काढली. रात्रभर पिण्याचे पाणी अनेकवेळा मागितले. पण, मला पाणी देण्यात आले नाही.
  • तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी मी दलित असल्याने मला एकाच ग्लासात पाणी देणार नसल्याचे म्हटलं. हा माझ्यासाठी धक्का होता. अशा प्रकारे, माझ्या जातीच्या आधारावर माझा थेट छळ करण्यात आला आणि केवळ याच कारणासाठी मला पिण्याचे पाणी दिले गेले नाही.
  • याशिवाय, मी दलित असल्याने या कारणावरुन पिण्याच्या पाण्यासारखे मूलभूत मानवी हक्क मला नाकारण्यात आले. तसेच मला रात्री बाथरूम वापरायचे असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. मला पुन्हा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. मला सांगण्यात आले की आम्ही खालच्या जातीतील लोकांना आमचे बाथरूम वापरू देत नाही.


हनुमान चालिसा वादात अटक झाल्यानंतर राणा दाम्पत्य 6 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...