पुणे-३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळून देणाऱ्या महिला महोत्सवात महिलांचा पाककला स्पर्धा, पुष्प रचना व मंगळागौरीचे खेळ स्पर्धा मंगळवार दि. ६ सप्टे. रोजी हॉटेल तरवडे क्लर्कस इन, शिवाजी नगर येथे पार पडल्या. महिलांच्या पाककला स्पर्धेचा यंदा रौप्य महोत्सव वर्ष आहे. दीपप्रज्वलनाने या स्पर्धांना प्रारंभ झाला. पाककला स्पर्धेत १५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. सौ. मीरा कलमाडी यांनी सर्व सहभागी महिलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

पाककला स्पर्धा ठिकाणी गोड चिरोटे करणे आणि घरून तिखट कोफ्ता करी करून आणणे असे दोन प्रकार होते. परीक्षक म्हणून मीना लागू, ज्योती कुलकर्णी, वैशाली कर्वे, विजया चांदोरकर आणि वैशाली भागवत या होत्या. निवेदन नीता मेहता यांनी केले. भारत पेट्रोलियम याचे प्रायोजक होते. अंजली वागळे यांनी याचे संयोजन केले होते.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
कोफ्ता करी निकाल –
प्रथम – सीमा नलावडे,
द्वितीय – लीना इनामदार ,
तृतीय – सरिता भुतडा,
उत्तेजनार्थ – मयुरी दोभाडा, वर्षा दोभाडा आणि तृप्ती खिंवसरा
चिरोटे स्पर्धा निकाल –
प्रथम – अरुणा जोशी,
द्वितीय – अनुजा जोशी,
तृतीय – वर्षा दोभाडा,
उत्तेजनार्थ – प्रगती अहिरे, सीमा नलावडे आणि मीना कदम
‘पुष्करणी’ हा फुलांची आवड असणाऱ्या व त्यांची कलात्मक मांडणी करणारा पुण्यातील महिलांचा ग्रुप आहे. त्यांच्या या आवडीमुळेच, काहीजणी जपानला जाऊन, ईकेबाना या जपानी कलेचे प्रशिक्षण घेऊन आल्या आहेत. पुष्करणीच्या सदस्यांना जपानी पुष्परचना म्हणजेच इकेबना सादरकरणेची संधी यावर्षी पुणे फेस्टिवलच्या महिला महोत्सवामध्ये मिळाली. गुलाब, ओरिएंटल आणि एशियाटिक लिलीम्स, बर्ड ऑफ पॅराडाईज, अदरक वनस्पती, अँथोरियाम्स, क्रिझेंटिम आणि ग्लॅडिओलस सारखी फुले या फुलांचा वापर फुलांच्या सजावटीमध्ये केला गेला.एकूण २० प्रकारच्या रचना केल्या गेल्या. संध्या काणेगावकर, अर्चना वैद्य, रागेणी कक्कर, शशिकला शेट्टी, मनीषा दीक्षित आणि मधु सरकार यांनी याचे आयोजन केले होते.
या बरोबरच महिलांचे मंगळागौरीचे खेळ सादर करून विविध महिला स्पर्धक गटांनी उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या. यामध्ये १० गट सहभागी झाले होते. फुगड्या, व्यायामाचे खेळ यावेळी सादर केले गेले. या मंगळागौरीचे खेळ स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक – स्वामिनी ग्रूप, द्वितीय क्रमांक – मानिनी ग्रूप. सुचित्रा जोगळेकर मेडदकर आणि प्रज्ञा गुरव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या महिला महोत्सवात मिस ऑस्ट्रेलियेशा डॉ. प्रचीती पुंडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अभिनेत्री स्मिता ओक म्हणाल्या ‘सध्याच्या धकधकी च्या जीवनात संवाद हरवलाय अशावेळी महिला महोत्सवाच्या निमित्याने महिला घराबाहेर पडतात, नव्या ने सर्वांशी ओळख होऊन संवाद वाढतो जे आत्ताच्या काळात अतिशय गरजेचं आहॆ.’ महोत्सवाचा शेवटी करुणा पाटील यांनी आभार मानले.