पुणे विभागातील 18 लाख 87 हजार 244 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 19 लाख 52 हजार 70 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 04 : पुणे विभागातील 18 लाख 87 हजार 244 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 52 हजार 70 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 524 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 302 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.68 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 18 हजार 433 रुग्णांपैकी 10 लाख 89 हजार 669 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 151 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 613 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 41 हजार 107 रुग्णांपैकी 2 लाख 27 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 91 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 900 रुग्णांपैकी 1 लाख 87 हजार 20 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 33 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 847 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 304 रुग्णांपैकी 1 लाख 85 हजार 344 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 879 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 4 हजार 326 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 370 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 328 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 947 , सातारा जिल्ह्यात 560, सोलापूर जिल्ह्यात 379 , सांगली जिल्ह्यात 325 तर कोल्हापूर जिल्ह्यात 117 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 520 आहे. पुणे जिल्हयामध्ये 880, सातारा जिल्हयामध्ये 685, सोलापूर जिल्हयामध्ये 384, सांगली जिल्हयामध्ये 438 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 133 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 55 लाख 46 हजार 842 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 52 हजार 70 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)