पुणे विभागातील 18 लाख 91 हजार 745 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 56 हजार 256 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 6 :- पुणे विभागातील 18 लाख 91 हजार 745 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 56 हजार 256 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 124 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 387 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.70 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 20 हजार 194 रुग्णांपैकी 10 लाख 91 हजार 762 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 803 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 629 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.46 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 41 हजार 998 रुग्णांपैकी 2 लाख 28 हजार 313 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 602 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 559 रुग्णांपैकी 1 लाख 87 हजार 845 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 852 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 926 रुग्णांपैकी 1 लाख 86 हजार 299 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 527आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 4 हजार 579 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 526 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 340 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 137 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 840, सातारा जिल्ह्यात 540, सोलापूर जिल्ह्यात 366, सांगली जिल्ह्यात 257 तर कोल्हापूर जिल्ह्यात 134 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 271 आहे. पुणे जिल्हयामध्ये 993, सातारा 194 जिल्हयामध्ये , सोलापूर जिल्हयामध्ये 444, सांगली 496 जिल्हयामध्ये व कोल्हापूर जिल्हयामध्ये 144 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 56 लाख 78 हजार 517 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 56 हजार 256 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )