पुणे विभागातील 19 लाख 7 हजार 148 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 67 हजार 560 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 12 :- पुणे विभागातील 19 लाख 7 हजार 148 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 67 हजार 560 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 19 हजार 805 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 607 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.93 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 25 हजार 456 रुग्णांपैकी 10 लाख 98 हजार 521 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 251 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 684 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.61 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 44 हजार 103 रुग्णांपैकी 2 लाख 31 हजार 755 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 147 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 97 हजार 188 रुग्णांपैकी 1 लाख 89 हजार 971 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 320 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 594 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 526 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 919 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 5 हजार 219 रुग्णांपैकी 1 लाख 98 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 396 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 646, सातारा जिल्ह्यात 202, सोलापूर जिल्ह्यात 188, सांगली जिल्ह्यात 280 तर कोल्हापूर जिल्ह्यात 80 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 989 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 193, सातारा 42 जिल्हयामध्ये , सोलापूर जिल्हयामध्ये 263, सांगली 387 जिल्हयामध्ये व कोल्हापूर जिल्हयामध्ये 104 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 60 लाख 39 हजार 711 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 67 हजार 560 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
**