पुणे विभागातील 7 हजार 896 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 12 हजार 662 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे:-पुणे विभागातील 7 हजार 896 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 हजार 662 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 171 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 248 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.36 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 851 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 184 आहे. कोरोनाबाधित एकूण 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 244 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 200, सातारा जिल्ह्यात 18, सोलापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 649 कोरोना बाधीत रुग्ण असून 368 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 253 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1303 कोरोना बाधीत रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 457 आहे. कोरोना बाधित एकूण 121 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 172 कोरोना बाधीत रुग्ण असून 96 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 70 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 687 कोरोना बाधीत रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 207 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 3 हजार 442 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 99 हजार 848 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 594 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 86 हजार 985 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 12 हजार 662 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
(टिप : – दि. 9 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)