फेस्टिव्हल च्या निमित्ताने कलमाडी महापालिकेत .. मग काय ? .. ती चर्चा … अन काय ते, स्मृतीगंधाचे दरवळणे, अन काय त्या पुल्लंकित झालेल्या आशा …सारे काही वेगळ्याच वातावरणात रमणारे…

पुणे- मी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे मी .. अस्सा रोख ठोक आवाज देणारे पुण्याचे तत्कालीन खासदार आणि नेते सुरेश कलमाडी यांच्या चाहत्यांना अजूनही कलमाडी नावाच्या वलयाची भुरळ सुटत नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट होते आहे.शरद पवारांनी राजकारणात आणलेला हा पहिलवान दिल्ली दरबारात आपले वजन ठेऊन पवारांच्या हातून निसटला आणि स्वतःकडे पुण्याची सूत्रे ठेवण्यात यशस्वी झाला होता .बीआरटी चा प्रकल्प फेल गेल्यावर अजीत दादांचा मैत्रीपूर्ण पुढे आलेला हाथ हातात घेऊनही कलमाडींची पुण्यावरील पकड सुटली होती. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडी अडकले आणि दिल्लीतला वरदहस्त ते गमावून बसले , या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना ९ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला . त्यानंतर कलमाडी यांची राजकीय कारकिर्द स्तब्ध झाली ,संपुष्टातच आली . ते शहराच्या राजकारणापासून अलिप्त झाले . पण … कलमाडींचे असंख्य चाहते अजूनही कलमाडींच्या नावाचे दिवास्वप्न उराशी बाळगून आहेत. कलमाडी यांनी सुरु केलेला पुणे फेस्टिव्हल अद्यापही सुरु ठेवण्यात आला आहे . उद्योग क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील व कला क्षेत्रातील त्यांच्या चाहत्यांचेच त्यात योगदान आहे . पण हा फेस्टिव्हल दरवर्षी , कलमाडी पुन्हा येतील .. अशी त्यांच्या चाहत्यांची आशा पल्लवित करून जातो आहे.
कलमाडी शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. तब्बल दहा वर्षानंतर( तसे त्याहून अधिक वर्षानंतर ) कलमाडी महापालिकेत आले. महापालिका आयुक्तांना पुणे फेस्टिव्हलचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. अर्थात हि त्यांच्या चाहत्यांची तमन्ना त्यांनी पूर्ण केली असू शकेल .त्यांची तब्बेत , आणि त्यापेक्षाही त्यांची त्यांच्या कारकिर्दीत असलेली मानसिक ताकद त्यांनी पूर्ववत वापरली तर जरूर ते राजकारणातील खिलाडी बनू शकतील .कलमाडींनी पुण्यात काही महत्वपूर्ण प्रकल्प जरूर आणले , पण आता बरेच पाणी वाहुन गेलेय … स्वप्नरंजना हून अधिक वर्तमानातील कर्तुत्वालाच सलाम केला जाणार आहे. बॉलीवूडमध्ये एक पहिला आणि अखेरचा सुपरस्टार जसा होता तसा कलमाडी हा पुण्याच्या राजकारणातील हुकमी एक्का होता .तसा हुकमी एक्का पुन्हा झाला नाही हे खरेच आहे. कोणत्याही पक्षाने तसा एक्का कदाचित कोणाला होऊ दिलेही नसेल . पण वर्तमान काळात आता च्या गणेश उत्सवापासून कलमाडी राजकारणात सक्रीय होणार काय ? या प्रश्नाची भुरळ अजूनही टाकली जाते आहे .हेच कलमाडींच्या नेतृत्वाचे गमक आहे.

पुणे फेस्टिव्हल चे सहप्रायोजकत्व महापालिकेने स्वीकारावे
दर वर्षी होणाऱ्या पुणे फेस्टिव्हल ला पुणे महापालिकेचे एकेकाळी आर्थिक सहाय्य मिळत , सहप्रायोजक महापालिका असत. महापालिकेतील सत्ता गेल्यावर काही वर्षे या फेस्टिव्हल ला महापालिकेने सहाय्य केले पण नंतर मात्र ते बंद करण्यात आले. आता पुन्हा महापालिकेने या फेस्टिव्हलचे सहप्रायोजकत्व स्वीकारावे अशी विनंती महापालिका आयुक्त यांना करण्यात आली आहे