तळजाई वर वृक्षमिञ पुरस्कार व वृक्षारोपण कार्यक्रम
पुणे-टीजेएसबी सहकारी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने पुण्यात तळजाई येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षारोपण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर मोकाट यांनी बँकेच्या सर्व सेवकांना मार्गदर्शन केले तसेच त्यांनी त्यांच्या वीस वर्षातील पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व वनौषधी तसेच सेंद्रिय शेती आणि औषधीयुक्त वणांची लागवड कशी करावी याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले .
नेमके कोणत्या जागेवर कोणते वृक्ष लावावेत ,लावण्याची पद्धत काय ,डोंगर भागात कमी पावसाच्या जागेत कुठल्या वृक्षांची झपाट्याने वाढ होईल, भारतीय संस्कृतीला कोणत्या वृक्षांची गरज आहे व भारतीय कुटुंबामध्ये संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या वनौषधींचे महत्व काय याचे महत्त्व त्यांनी सर्वांना पटवून सांगितले त्यानंतर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपण केले त्यानिमित्त संघटनेच्या वतीने दिगंबर मोकाट ,कडुबा निकाळजे तसेच श्रीनिवास जगताप यांना यावेळी वृक्षमित्र पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सोमण सर तसेच नोबो संघटनेचे अॉल इंडीया जॉईंट सेक्रेटरी श्री विराज टिकेकर हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री अरुण देसाई यांनी गेल्या ४ वर्षांपासून सतत संघटना वृक्षारोपण करीत असल्याचे सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले व यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श शरद जाधव यांनी कार्यक्रमास सहकार्य लाभलेल्या नगरसेवक सुभाष जगताप व श्रीनिवास जगताप यांचे आभार मानले तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी वड ,पिंपळ ,लिंब ,बकुळ अशा विविध एकूण 93 वृक्षांचे वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.