पुणे : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून पुण्याचे सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव म्हणून औरंगाबादचे अरूणराव देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
हरियाणातील फरिदाबाद येथे ही सभा पार पडली. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गुजरात मधील बडोद्याचे नारायणभाई शहा यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तीन दिवस चाललेल्या या सर्वसाधारण सभेस देशभरातून २३७ प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या समारोपामध्ये पुढील तीन वर्षांकरिता ३४ सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली गेली.
सूर्यकांत पाठक ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासून आजतागायत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री, क्षेत्रीय संघटनमंत्री तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इ. जबाबदार्या सांभाळल्या होत्या. औरंगाबादच्या अरूणराव देशपांडे यांनी यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तसेच राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.