पुणे– पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ, पीसीएलटीए आणि एमडब्लूटीए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत निलेश ओस्तवाल, जयदीप वाकणकर, आशिष मणियार, राजेश मंकणी, अभिषेक सिंग, विवेक खाडगे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एमडब्लूटीए संघाने सोलारिस फायटर्स संघाचा 18-05 असा पराभव दुसरा विजय मिळवला. `
अन्य लढतीत पीवायसी अ संघाने सोलारिस आरपीटीएचा 18-03 असा तर, पीसीएलटीए संघाने लॉ चार्जर्स संघाचा 18-04 असा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. डेक्कन 1 संघाने पीवायसी इ संघावर 14-08 असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एमडब्लूटीए वि.वि.सोलारिस फायटर्स 18-05(80अधिक गट: निलेश ओस्तवाल/जयदीप वाकणकर वि.वि.मनोज पालवे/महेंद्र गोडबोले 6-2; खुला गट: आशिष मणियार/राजेश मंकणी वि.वि.राजू पिंपळे/बापू पायगुडे 6-3; अभिषेक सिंग/विवेक खाडगे वि.वि.प्रसाद श्रीमणी/गलगली 6-0);
पीवायसी अ वि.वि.सोलारिस आरपीटीए 18-03(80अधिक गट: अमित नाटेकर/योगेश पंतसचिव वि.वि.संजीव घोलप/रवी कात्रे 6-2; खुला गट: सारंग देवी/कौस्तुभ शहा वि.वि.ओंकार नामदास/गिरीश साने 6-0; खुला गट: मिहीर दिवेकर/अमित लाटे वि.वि.अन्वित पाठक/सिद्धू बी 6-2);
डेक्कन 1 वि.वि.पीवायसी इ 14-08(80अधिक गट: मनोज देशपांडे/मंगेश प्रभुदेसाई वि.वि.पराग चोपडा/प्रियदर्शन डुंबर 6-0; खुला गट: आनंद कोटस्थाने/अमोल बापट वि.वि.अजिंक्य मुथा/शैलेश लिमये 6-2; खुला गट: नितीन संगमनेकर/प्रसाद काळे पराभूत वि.संग्राम पाटील/राहुल गांगल 2-6);
पीसीएलटीए वि.वि.लॉ चार्जर्स 18-04(80अधिक गट: अनंत गुप्ता/निर्मल डब्लू वि.वि.नितीन खैरे/राहुल मंत्री 6-2; खुला गट: राजेश मित्तल/प्रविण घोडे वि.वि. केतन रुईकर/श्रीनिवास रामदुर्ग 6-2; खुला गट: कुरियन थडकन/रवी जौकनी वि.वि.समीर बाफना/संदीप माहेश्वरी 6-0).