16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019-20 स्पर्धेत सनगार्ड एएस संघांचा सलग दुसरा विजय
पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत साखळी फेरीत एलटीआय, गालघर ,सनगार्ड एएस व झेंन्सर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
व्हिजन क्रिकेट मैदान येथे झालेल्या सामन्यात साखळी फेरीत कौस्तुभ बकरेच्या 69 धावांच्या बळावर सनगार्ड एएस संघाने दसॉल्ट सिस्टिम्स संघाचा 1 गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना दसॉल्ट सिस्टिम्स संघाने 20 षटकात 8 बाद 148 धावा केल्या. 148 धावांचे लक्ष कौस्तुभ बकरेच्या 69 व पार्थ शर्माच्या 21 धावांसह सनगार्ड एएस संघाने 19.3 षटकात 9 बाद 152 धावा करून पुर्ण केले. कौस्तुभ बकरे सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत मयंक वैदच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर एलटीआय संघाने ग्लोबाकॉम संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना राहुल कृष्णनच्या 37 व अकबर अली खानच्या 35 धावांसह ग्लोबाकॉम संघाने 20 षटकात सर्वबाद 133 धावा केल्या. 133 धावांचे लक्ष सुमित पांडाच्या 41 , आयुष अवस्थीच्या नाबाद 34व मयंक वैदच्या नाबाद 44 धावांसह एलटीआय संघाने केवळ 13.5 षटकात 3 बाद 138 धावा करून सहज पुर्ण करत सामना जिंकला. मयंक वैद सामनावीर ठरला.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीत शुबेंदू पांडेच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गालघर संघाने पबमॅटीक संघाचा 7 गडी राखून पराभव केला. शुबेंदूने 28 धावात 3 गडी बाद व 51 चेंडूत नाबाद 85 धावा केल्या. अकिब पिरझादेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर झेंन्सर संघाने हर्मन संघाचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
दसॉल्ट सिस्टिम्स- 20 षटकात 8 बाद 148 धावा(अभिषेक वर्मा 27 (21), मंदार जोशी 21 (18), पियुष इंगळे 39 (30), सचिन पाटील 32 (16), अश्विन गोरेल 2/32) पराभूत वि सनगार्ड एएस- 19.3 षटकात 9 बाद 152 धावा(पार्थ शर्मा 21 (12), कौस्तुभ बकरे 69 (55), विकास कुमार 2/25 , सचिन पाटील 2/33 , पियुष इंगळे 2/33) सामनावीर- कौस्तुभ बकरे
सनगार्ड एएस संघाने 1 गडी राखून सामना जिंकला.
ग्लोबाकॉम- 20 षटकात सर्वबाद 133 धावा(राहुल कृष्णन 37 (39), अकबर अली खान 35 (28), शुभम शर्मा 3/22 , दिपक मिश्रा 2/30) पराभूत वि एलटीआय- 13.5 षटकात 3 बाद 138 धावा(सुमित पांडा 41 (14), आयुष अवस्थी नाबाद 34 (29), मयंक वैद नाबाद 44 (26), हरिष कल्लादथील 2/26) सामनावीर- मयंक वैद
एलटीआय संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
पबमॅटीक- 20 षटकात 9 बाद 165 धावा(सुमित जुई 32 (31), तुषार शिरोडकर 24 (19), अमित जोशी नाबाद 69 (37), शुबेंदू पांडे 3/28, गौरव बाजपई 5/22) पराभूत वि गालघर- 17 षटकात 3 बाद 166 धावा(शुबेंदू पांडे नाबाद 85 (51), श्रिकांत सोमवंशी 58 (37), सोनल सौरभ 2/23) सामनावीर- शुबेंदू पांडे
गालघर संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
हर्मन- 20 षटकात 7 बाद 123 धावा(नितिन नारळे 36 (44), निशांत खंडागळे नाबाद 34 (27), अकिब पिरझादे 3/19, अनिल त्रिपाठी 2/17) पराभूत वि झेंन्सर- 16 षटकात 5 बाद 124 धावा(ऋषिकेश राऊत नाबाद 45 (42), सिध्दार्थ जालन 35 (19), अभिषेक धनावडे 3/33) सामनावीर- अकिब पिरझादे
झेंन्सर संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.