पुणेः-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव येथे उभ्या राहिलेल्या शिवसृष्टी सरकार वाड्यामध्ये दिवाळी संध्याच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता कात्रज आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या सरकारवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळी संध्याच्या निमित्ताने सरकार वाड्यावर पणत्या, रांगोळ्या, पायघड्या, सनई-चौघडा, तुतारी, गजरे, अत्तर, गुलाबपाणी, यांच्या समवेत स्वागत करण्यात येणार असून रंगमंचावर शिवशाही दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. 5 नोव्हेेंबर, मराठी रंगभूमी दिन म्हणुन साजरा केला जातो. याचेही आैचित्य साधत नांदी, वासुदेव, पोवाडा, देवीचा गाॆधंळ, भारूड, गवळण, वाघ्या-मुरळी, पोतराज, लावणी, मर्दानी खेळ, असे लोकपरंपरा असणारे सांस्कृतिक कार्यक्रम व शिवकालीन युद्ध कला प्रात्येक्षिक त्यात प्रामुख्याने लाठी-काठी, दांडपट्टा, आदी साहसी युद्ध प्रकारांचा समावेश असणार आहे.या कार्यक्रमाची मूळ संकल्पना संवाद पुणे चे सुनील महाजन यांची असून निर्मिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांची आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन योगेश शिरोळे यांचे आहे.
या कार्यक्रमात रंगभूमी चित्रपट क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटविणा-या आशा काळे आणि ज्येष्ठ ईतिहास तज्ज्ञ पांडूरंग बलकवडे यांना जीवनगाैरव पुरस्कार देण्यात येणारआहे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, महापौर मुरलीधर मोहोळ, कृष्णकुमार गोयल फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल,जंजीरा हाॅटेलचे चेअरमन विलास चोरगे,समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमात उपस्थित राहून अनोख्या दिवाळीसंध्याचे साक्षिदार होण्याचे आवाहन संवाद पुणे चे अध्यक्ष सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवरांनी केले आहे.