पुणे : भगवान पार्श्वनाथ जन्मकल्यानक निमित्त सारसबागे समोरील दादावाडी जैन मंदिरात प. पु. आचार्य श्री धर्मधुरंधर सुरीश्वरजीम.सा. व साधू साध्वीजींच्या उपस्थितीत तीन दिवसाचा महामोहत्सव व अठ्ठम तप आराधना ( ३ निरंकार उपवास ) चे आयोजन करण्यात आले आहे. आज रोजी श्री पार्श्वनाथ भगवान चे संगीतमय वातावरणात अढार अभिषेक करण्यात आले. दि. २१ डिसेंबर रोजी शोभायात्रा सुजय गार्डन मुकुंदनगर येथून लक्ष्मीनारायण चौक,मित्रमंडळ , सारसबाग मार्गी दादावादी मंदिर काढण्यात येणार आहे. या प्रसंगी दादावादी मंदिरात प.पु. आचार्य भगवंतांचे मांगलिक प्रवचन होणार आहे. दि. २२ डिसेंबर २०१९ रोजी १०८ पार्श्वनाथ महापूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.या अठ्ठम तप आराधना मध्ये सुमारे ४०० तपस्विनीं सहभाग घेतला आहे.अशी माहिती प्रचार प्रमुख संपत जैन यांनी दिली.