पुणे- भारती हॉस्पिटलच्या आवारात रुग्ण अगर रुग्णांच्या नातलगांना सोडण्यात येणाऱ्या अगर तेथून घेऊन जाणाऱ्या ना मिटर प्रमाणे भाडे न आकारता जादा भाडे वसुली करणे ,भाडी नाकारणे अशा स्वरूपाची लुट काही रिक्षा चालकांकडून होत असून भारती हॉस्पिटल प्रशासनाने आणि येथील पोलिसांनी तातडीने लक्ष घालून असे रिक्षा येथून बाहेर काढाव्यात अशी मागणी होते आहे. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना हि मेसेज केले असता व्हाटसएप फोटो केले असता अशा अधिकारी वर्गाकडूनही अशा तक्रारदारांना तुम्ही इकडे येऊन लेखी सविस्तर तक्रार करा अशा सूचना करण्यात येत असल्याने अशा अधिकारी वर्गाबद्दल हि रुग्ण आणि त्यांच्या नात्लागांक्डून संताप व्यक्त होतो आहे . रिक्षा संघटनेचे नितीन पवार यांच्या कडे देखील येथून लोक फोन करतात , मेसेज करतात पण त्यांच्या कडून केवळ संबधितांना सूचना दिल्या आहेत असे सांगून बोळवण केली जाते आहे . जोवर अशा लुट करणाऱ्या रिक्षांवर त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होणार नाही तोवर हे प्रकार येथे सर्रास सुरूच राहतील असे स्पष्ट चित्र आहे .