- पीवायसीच्या सय्यद सुफयानची द्विशतकी, तर साईराज चोरगेची शतकी खेळी
पुणे, 18 नोव्हेंबर 2021: एमसीएच्या वतीने आयोजित एमसीए १६ वर्षाखालील निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सय्यद सुफयान(नाबाद 214धावा), साईराज चोरगे(163धावा) यांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने ट्रिनिटी क्रिकेट संघावर पहिल्या डावाच्या 117 धावांच्या आघाडीच्या जोरावर सनसनाटी विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या दोन दिवसीय लढतीत ट्रिनिटी क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 90षटकात 2 गड्याच्या बदल्यात 442धावाचा डोंगर उभा केला. सलामीचचे फलंदाज सय्यद सुफयानने अफलातून फटकेबाजी करत 300 चेंडूत 32चौकारांच्या मदतीने नाबाद 214धावांची खेळी केली. त्याला साईराज चोरगेने 179चेंडूत 27चौकारांसह 163धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. या सलामीच्या जोडीने 411चेंडूत 323 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. साईराज चोरगे बाद झाल्यानंतर सय्यदने अंजनेया पुराणिक(59धावा)च्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 115चेंडूत 95धावांची भागीदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ट्रिनिटी क्रिकेट अकादमीकडून अमन सिंग(1-37), विनीत करंकळ(1-79) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
याच्या उत्तरात पहिल्या डावात ट्रिनिटी क्रिकेट अकादमी संघाला 90षटकात 8 बाद 325धावाच करता आल्या. यामध्ये आरहन एसने एकाबाजूने लढताना 224चेंडूत 22चौकारासह 139धावांची खेळी केली. तर अमन सिंग 58, मिहीर शहाणे 33, विनीत कारंकळ 23 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून साईराज चोरगे(3-91), आर्यन पानसे(2-52), सय्यद सुफयान(1-14) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 117धावांची आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पीवायसी संघाने पहिल्या डावाच्या अधिक्याच्या जोरावर विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी करणारा साईराज चोरगे सामन्याचा मानकरी ठरला.
निकाल: पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 90षटकात 2बाद 442धावा(सय्यद सुफयान नाबाद 214(300,32×4), साईराज चोरगे 163(179,27×4), अंजनेया पुराणिक 59(57,7×4), अमन सिंग 1-37, विनीत करंकळ 1-79) वि.ट्रिनिटी क्रिकेट अकादमी: 90षटकात 8 बाद 325धावा(आरहन एस 139(224,22X4), अमन सिंग 58(90,12×4), मिहीर शहाणे 33(69,4×4), विनीत कारंकळ 23(21), साईराज चोरगे 3-91, आर्यन पानसे 2-52, सय्यद सुफयान 1-14); सामना अनिर्णित; सामनावीर-साईराज चोरगे; पीवायसी संघ पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विजयी.