पुणे फेस्टिवल महिला महोत्सवात रंगल्या पाककृती, मेंदी आणि उखाणे स्पर्धा
पुणे :
28 व्या ‘पुणे फेस्टिवल’ मध्ये रविवारी दिवसभर महिला महोत्सवात पाककृती, मेंदी आणि उखाणे स्पर्धा रंगल्या. पाककृती स्पर्धेत रवा आणि खोबर्याच्या पदार्थांचा समावेश होता. मेंदी स्पर्धेला ‘वधू’ साठी हाताच्या कोपरापर्यंत मेंदी असा विषय देण्यात आला होता. शंभरहून अधिक महिला स्पर्धक सहभागी झाल्या.
किशोर सरपोतदार, रचना पाटील, यांनी पाककृती स्पर्धेचे परीक्षण केले. अनमोेल कला संस्थेने मेंदी स्पर्धेचे परीक्षण केले. तर उखाणे स्पर्धेसाठी विद्या देसाई, मंगला बोरावके या परीक्षक होत्या. संयोगिता कुदळे, दीपाली भंडारे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.