तरन्नुम सय्यद यांची बारामती नगर परिषद उपाध्यक्षपदी निवड
पुणे:
सौ. तरन्नुम सय्यद यांची बारामती नगर परिषद उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या तरन्नूम सय्यद या उच्चशिक्षित अभियंता आहेत. या आधी आरोग्य समितीच्या सभापतीं म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तरन्नूम सय्यद यांना संधी दिली. बारामती नगर परिषदेच्या त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत. एकता नागरी महिला पतसंस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत.
आलताफभाई सय्यद ,संचालक – मुस्लिम बँक यांच्या त्या पत्नी आहेत. या निवडबद्दल त्यांचे बारामती मधील अल्पसंख्य समुदाय तसेच मुस्लिम सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी अभिनंदन केले.