पुणे ः
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत’रागभावरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार,८ नोव्हेंबर २०१९ सायं ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘रागभावरंग’ ही शास्त्रीय संगीतावर आधारित मराठी व हिंदी नाटयगीते, भावगीते,भक्ती गीते, लावणी, निसर्ग गीत, चित्रपट गीतांची मैफिल आहे.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
या कार्यक्रमात डॉ. सौ. अनघा राजवाडे, नीरज केतकर व चंद्रकांत निगडे(गायन),उदय शहापूरकर(हार्मोनियम),अशोक मोरे(तबला),रमेश मंगळूरकर(तालवाद्य),प्राजक्ता मांडके(निवेदन) हे सहभागी होणार आहेत.