पुणे -इंदौर, आग्रा अशा परप्रांतीय ठिकाणांवरुन पिडीत महिलांना वॉट्सअॅप द्वारे संपर्क करुन पुणे येथे
बोलावुन सेक्स रॅकेट चालवणारे टोळीवर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेने येथे कारवाई केली.
परराज्यातील मुली/महिला यांना काही इसम वॉट्सअॅप द्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशांचे अमिष दाखवुन पुणे शहरात बोलावुन घेवुन त्यांना वेश्याव्यवसाकरीता पुरविण्याचा धंदा सुरु असलेबाबत सामजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा येथे माहीती प्राप्त झाली होती.
त्यानंतर अशा एजंट व्यक्तींची तसेच त्यांनी वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना संपर्कासाठी दिलेले मोबाईल
नंबरची गोपनीय माहीती काढुन सामाजिक सुरक्षा विभाग कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन बनावट ग्राहकाकरवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता एजंटने खराडी परिसरात लॉज मध्ये दोन रुम बुक करण्यास सांगितल्या. त्याप्रमाणे बनावट ग्राहकांकरवी खराडी पुणे येथील लॉज मध्ये दोन रुम बुक करुन सापळा रचुन आडबाजुला टिम दबा धरुन थांबली असता काही वेळातच एक इसमाने दोन मुलींना मोटर सायकलवरुन आणुन सदर लॉज येथे सोडले. त्या मुली बनावट ग्राहक थांबलेल्या रूम मध्ये गेल्यानंतर अचानाक छापा टाकला असता सदर ठिकाणी परप्रांतीय दोन मुली त्यामध्ये मध्य प्रदेश येथील एक व उत्तर प्रदेश येथील एक अशा मुली मिळुन आल्याने त्यांची वेश्याव्यवसायातून सुटका करुन सुरक्षिततेकामी ताब्यात घेवुन रेस्क्यु होम येथे ठेवण्यात
आले आहे.यातील पिडीत मुलींना वेश्यागमनासाठी सोडण्यास आलेल्या इसमास त्याचेजवळील मोटर सायकलसह ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द व पाहीजे असलेले दोन आरोपींविरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे भा. द. वि कलम ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त,
पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार तसेच सपोनि. अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदिप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.