पुणे -महापालिकेतील भाजपच्या सत्तेला रविवारी (दि. 23) तीन वर्षे पूर्ण झाले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एक हाती सत्ता देत 98 नगरसेवक निवडून दिले होते. पण प्रत्येक वेळी भाजपने अंदाजपत्रकात नाम मात्र तरतूद कोथरुड च्या शिवसृष्टी साठी करत नंतर तीच तरतूद वर्ग करत शिवसृष्टी हा निव्वळ एक कागदाव रील आभास निर्माण करून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.पंतप्रधान मोदी 2 वेळा पुण्यात आले , फडणवीस अनेकदा मुख्यमंत्री असताना पुण्यात आले. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील मुक्ता टिळक या सुमारे पावणे तीन वर्षे महापौर होत्या. पण शिवसृष्टी चा कागद काही हलला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसृष्टी साठी जागा, पैसे देण्याची तयारी दर्शवुन देखील शिवसृष्टी प्रकल्प प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कोणतीही कृती झाली नसली तरी या विषयावर फेटे घालून मोठी भाषण बाजी मात्र झाल्याचे दिसून आले आहे .
भाजपने अनेक मोठमोठ्या प्रकल्पांचे स्वप्न दाखविले होते. त्यामधील अनेक प्रकल्प केवळ कागदावरच आहेत. बालगंधर्व पुनर्विकास, महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय, भामा – आसखेड, 24 तास पाणीपुरवठा योजना, शिवसृष्टी, चांदनी चौक उड्डाणपूल, अशा अनेक प्रकलपांचा समावेश आहे.