पुणे, 5 मे 2022: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित नमिश हूडने आपल्या दमदार खेळात सातत्य राखत दुस-या मानांकीत वरद उंडरेचा 7-5, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित स्मित उंडरेने तिस-या मानांकित आरव पटेलचा 6-1, 6-1 असा एकतर्फी लढतीत सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत तिस-या मानांकीत रितिका दावलकरने श्रावी देवरेचा 6-2, 2-6, 6-0 असा तर दुस-या लढतीत चौथ्या मानांकीत सृष्टी सूर्यवंशीने पाचव्या मानांकित रित्सा कोंडकरचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य) फेरी:12 वर्षाखालील मुले: स्मित उंडरे[1] वि.वि.आरव पटेल[3] 6-1, 6-1नमिश हूड वि.वि.वरद उंडरे[2] 7-5, 6-1
मुली:रितिका दावलकर [3] वि.वि. श्रावी देवरे 6-2, 2-6, 6-0सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.रित्सा कोंडकर[5] 6-2, 6-0