पुणे-
स्वतःच्या पायावर उभे राहताना, वेगळं काहीतरी करून दाखविताना समाजातील विविध घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही जेंव्हा ध्येय बनते. सातत्याने त्यादिशेनेच प्रत्येक पाऊल टाकले जाते ,तेंव्हा असे कार्य समाजाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शन करणारे ठरते.अशा शब्दात विविध वक्त्यांनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला.
जागतिक महिला दिनानिमित्त माजी उपमहापौर आबा बागुल मित्र परिवारातर्फे समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्रीताई बागुल, राजू घाटोळे, मनिषा निंबाळकर, घनशाम सावंत, नंदकुमार बानगुडे, निलमताई गांधी, रुपालीताई कदम, ताई कसबे, नंदा धावरे, ज्योती आरवेन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजक आबा बागुल म्हणाले की, जागतिक महिला दिनामुळे आज आपल्याला महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे हे प्रकर्षाने दिसून येते मात्र हे केवळ एक दिवसापूर्वी सीमित न राहता दररोज महिलांच्या कर्तृत्वाला वाव दिला पाहिजे आणि ती मानसिकता आपण जोपासली पाहिजे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, महेश ढवळे, संतोष पवार,अभिषेक बागुल, यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन अमित बागुल यांनी केले यांनी केले तर आभार सागर आरोळे यांनी मानले