पुणे, दि. २० एप्रिल २०२३: महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पुणे परिमंडलाच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच झाले.
या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत व श्री. सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) तसेच सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी आणि लघुप्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांची उपस्थित होते.
महावितरणकडून पुणे परिमंडलातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी तसेच महावितरणशी संबंधित एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांना, प्रतिनिधींना विविध प्रकारचे नियमित प्रशिक्षण देण्यात येते. पुणे परिमंडलाच्या रास्तापेठ येथील पूर्वीच्या मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्राची जागेमध्ये ८० जणांची आसनव्यवस्था तसेच प्रोजेक्टर, ध्वनी व्यवस्था उभारून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करण्यात येणार आहे.