पुणे- सातारा रोडवरील आदिनाथ सोसायटीमधील श्री अंबाजी मंदिरचा जीर्णोद्वार व सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्साहात संपन्न झाला . आदिनाथ सोसायटीमधील पन्नास वर्ष जुने असलेले राजस्थान – गुजरात के धर्तीपर सांस्कृतिक व धार्मिक पारंपरिक रास दांडिया , माता कि चौकी व महाआरती कार्यक्रम संपन्न झाले . तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . यावेळी लकी ड्रा काढण्यात आला . यावेळी हजारो माताजी भक्त पूजा व सेवेसाठी या उत्सवात सहभागी झाले होते . नव्या मंदिरात अंबाजी , महालक्ष्मी सरस्वती , ओखीयाजी सुंदाजी माताजी व अन्य दोन मंदिरांना मिळून त्रिशिखरीय मंदिराची उभारणी मार्बलमध्ये करण्यात आली आहे . पुणे शहरात पहिल्यांदा अशा प्रकारे मंदिराची उभारणी करण्यात आली आहे . या मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार स्के. फूट मार्बलचा वापर करण्यात आला आहे .
श्री अंबाजी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गरजू , होतकरू व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते . तसेच वैद्यकीय मदत केली जाते . वैद्यकीय तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन देखील केले जाते . कला क्षेत्रामध्ये युवक युवतीना स्पर्धा व परीक्षेद्वारे प्रोत्साहित केले जाते . महिला व युवतींना योग्य सन्मान दिला जातो . व्यवसायिक कलाकारांच्या माध्यमातून नव्या कलाकारांना तयार केले जाते . अशी माहिती श्री अंबाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र जैन यांनी दिली .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन भंडारी , प्रमुख पाहुणे म्हणून अभय छाजेड , प्रविण चोरबेले , विशेष आमंत्रित मोहनलाल ओसवाल , विजय गांधी , मोहनलाल सोनिग्रा , कन्हेय्यालाल वाघरेशा , रमेश बाफना , लिलाचंद बाफना , अशोक पोरवाल , हितेश नीबजीया , ललित खिंवसरा , जयंत बाफना , सुनिल सरनोत , प्रकाश नीबजीया , विजयादशमी प्रयोअजक प्रिती बाफना , बडी सांझी प्रायोजक चंद्ररेखा प्रविण सोलंकी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी श्री अंबाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भोगीलाल शहा , चेअरमन महेंद्र जैन , मॅनेजिंग ट्रस्टी महेंद्र खिंवसरा , मणिलाल ओसवाल , मदनलाल बलदोटा , प्रदीप गुंदेशा , हेमंत मसालिया , राजेश जैन , सल्लागार प्रविण गुंदेशा , राजेंद्र शहा, चंद्ररेखा सोळंकी , रेखा सोळंकी , भाग्यवती जैन , प्रभावती ओसवाल , शैला शहा , गीता जैन आदीनी उत्सवासाठी विशेष परिश्रम घेतले .