पुणे- महाविकास आघाडीच्या स्थानिक ३ नेत्यांनी काल महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर टीका केली ना केली तोच काल सायंकाळी लगेचच महपौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर बंगल्यातून या टीकेवर पलटवार केला . ते म्हणाले , लॉक डाऊन शिथिल करण्यास माझा विरोध आहेच . राज्य सरकारने शिथिल तेचा निर्णय घेतला आहे . राज्य सरकारच महापालिकेचा कारभार सध्याच्या आपत्तीच्या काळात चालवीत आहे . सोशल मिडीयाच्या माध्यमातून महापौरांनी हा पलटवार केला आहे. मात्र पूर्वी आपण दुकानांसाठी वेळ वाढवून मागितली आणि आता वेळ वाढविण्यास विरोध करीत आहोत , ७० हजार कुटुंबांचे आपण स्थलांतर करणार होतो यावर मात्र महापौरांनी भाष्य केलेले नाही .
पहा आणि ऐका नेमके महापौर काय म्हणाले त्यांच्याच शब्दात ….