पुणे-सहकारनगर-शिवदर्शन परिसरातील हजारो महिलांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार व त्यांच्या पत्नी सौ. कुमार यांच्या व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमातेची महाआरती काल सायंकाळी करण्यात आली. अष्टमीनिमित्त आयोजित केलेल्या या महाआरतीला परिसरातील महिला पंचारतीसह सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याकडील तबकात लावलेल्या दिव्यांच्या मंद प्रकाशात सर्व मंदिर परिसर उजळून निघाला होता.
या महाआरतीत महापालिका आयुक्त विक्रमकुमार व सौ. स्वाती विक्रमकुमार, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व मार्गदर्शक उल्हास पवार व सौ. पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, पुणे महिला काँग्रेस अध्यक्षा सोनाली मारणे, सुनील कडुसकर व सौ. कडुसकर, वास्तुविशारद राजवाडे व सौ. राजवाडे, सौ. स्मिता केंजळे, सौ. रेखा बर्गे, सौ. सुजाता निम्हण, सौ. वैशाली निकम, सौ. ज्योती काकडे, सौ. आशा भांड, सौ. संगीता मंत्री, सौ. गायत्री पाटील, सौ. मनीषा निंबाळकर, सौ. जगताप आदी मान्यवर यावेळी आवर्जून सहभागी झाले होते.
महाआरतीनंतर मंदिराच्या आवारात आयोजित केलेल्या भोंडल्यामध्ये व गरबा नृत्यातही असंख्य महिला व भाविक सहभागी झाले होते. मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली असली तरी करोनाचे सर्व निर्बंध पाळण्याकडे आयोजकांचा कटाक्ष होता.
शिवदर्शन परिसरात माता लक्ष्मीचे पेशवेकालीन मूलस्थान आहे. 27 वर्षांपूर्वी त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथे दाक्षिणात्य वास्तुकलेवर आधारित सुंदर कलाकुसरीच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराचे प्रवेशद्वारही याच पद्धतीच्या रेखीव नक्षीकामाने सजलेले आहे. तेव्हापासून पुणे नवरात्रौ महोत्सवालाही सुरुवात करण्यात आली. 27 वर्षांपासून साजरा होणार्या या महोत्सवात करोनामुळे एक वर्ष खंड पडला असला तरी हे संकट दूर होताच तो पूर्वीच्याच दिमाखात सुरू करण्यात येईल, असे या महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी सांगितले.