पुणे- गेल्या २२ मार्च पासून लॉक डाऊन चा अनुभव घेत कंटाळलेल्या ,रखडलेल्या पुणेकरांना आता लॉक डाऊन ४ कसा असेल याबाबत उत्सुकता निश्चित आहे. पण यामध्ये फारसा त्रास नागरिकांना होणार नाही याची काळजी घेत संसर्ग वाढू नये याबाबतची दक्षता महापालिका आयुक्त घेणार आहेत त्यामुळे हा लॉक डाऊन ४ दिलासा दायी ठरू शकेल काय ? या प्रश्नाला उत्तर होय असेच द्यावे लागणार आहे. फक्त रेड झोन आहे तिथे काटेकोर पणे अंमलबजावणी मात्र प्रशासनाला करावी लागणार आहे . आणि एकंदरीतच अन्य झोन मध्ये काळजीपूर्वक पद्धतीने नागरिकांना आपली जीवनशैली बदलावी लागणार आहे . अशा पद्धतीने जीवन शैलीत बदल केला तर सर्व व्यवहार लवकरच पूर्ववत सुरु होतील असे मानले जाते या सर्व पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी साधलेला हा अल्पसा संवाद ऐका.. म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा ..ऐका तर खरे