मधुरा चिपाडे म्हणाल्या, “महोत्सवात लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या महिला व्यावसायिकांना, बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर, इंदोर, बरेली, अहमदाबाद, मुंबई येथील विविध कलाकुसरीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचा यामध्ये समावेश आहे. येथे ७० हुन अधिक स्टॉल्स असणार आहेत. महोत्सवात लहानग्यांना खेळण्यासाठी स्वतंत्र ‘किड झोन’सह सर्व वयोगटातील लोकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम असणार आहेत. वर्ल्ड ऑफ पझल गेम्स, लाईव्ह म्युझिक, कलात्मक विषयावरील विविध कार्यशाळा, गेम्स, टॅटू, फेस पेंटींग असे निरनिराळे उपक्रम होणार आहेत. महोत्सवात आलेल्या नागरिकांना लाईव्ह म्युझिकचा मनमुराद आनंद घेता येणार आहेत. तसेच येथे अनेक नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण वस्तू खरेदीसाठी मांडण्यात येणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या संपूर्ण कुटुंबाचा सुट्टीचा वेळ मजेत जाईल, यासाठी येथे निनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.”
महिला व्यावसायिकांचा ‘द बिझारो फेस्ट’ बाणेरमध्ये रंगणार
पुणे : महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ऍडोरा एलएलपी, सोशल हाथी आणि गोल्डन टयुलिप इव्हेंट पुणे यांच्या वतीने येत्या शनिवारी (१ फेब्रुवारी) आणि रविवारी (२ फेब्रुवारी) ‘द बिझारो फेस्ट’ : प्रदर्शन व फन-फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बाणेर येथील धनकुडे फार्म्स येथे भरविण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक अमोल बालवडकर व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत या महोत्सवाचा आनंद पुणेकर रसिकांना लुटता येणार आहे, अशी माहिती संयोजिका मधुरा चिपाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी अजित जुवेकर, स्मरणिका जुवेकर, विजय लचके, स्नेहा देशपांडे, अजिंक्य गोखले आदी उपस्थित होते.
लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन व एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि धम्माल गेम्स अनुभव येणार आहेत. महोत्सवात विविध पदार्थांच्या खाद्य जत्रेसह सहभागी होता येईल. तसेच येथे पुणेकर खवैय्यांना महाराष्ट्रीय खाद्यांची चव चाखता येणार आहे. शिवाय, भरपूर खेळ, गायनाचे कार्यक्रम अनुभवता येतील., असे स्नेहा देशपांडे यांनी नमूद केले