पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय स्टार खेळाडूंसह 13 विविध देशांतील अव्वल कुमार खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे दि.30नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत रंगणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे म्हणाले की, स्पर्धेत चीन, थायलंड, जपान, रशिया, यूएसए, रोमानिया, अल्जेरिया, कझाकस्तान, न्यूझीलँड, चेक प्रजासत्ताक, सोलोमन आईसलँड्स तैपेई आणि भारत अशा एकूण 13 विविध देशांतील अव्वल कुमार खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. गेल्या 5वर्षांपासून अर्जुन गद्रे आणि गद्रे मरिन्स् यांनी या स्पर्धेला पाठिंबा दिल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो. तसेच, स्पर्धेतील विजेत्यांना एमव्ही देव करंडक देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि रत्नागिरी व गोवाव्यतिरिक्त भारतातील सर्वात मोठी मरिन हाऊस एक्स्पोर्ट असलेले गद्रे मरिन्स्चे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन गद्रे म्हणाले की, 2019मधील स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यामध्ये 13 विविध देशांतील कुमार खेळाडूंनी सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे यावर्षी अव्वल कुमार खेळाडूंमधील चुरशीची अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. भारतीय खेळाडूंना या स्पर्धेचा नक्कीच फायदा होईल अशी अशा असल्याचे त्यांनी सांगतिले. गद्रे मरिन्स नेहमीच क्रीडा स्पर्धांना पाठिंबा देत असून आपला प्लांट स्थापित असलेल्या रत्नागिरी येथे गद्रे मरिनने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेलादेखील पाठिंबा दिला आहे.
गद्रे मरिन्स् एक्स्पोर्टचे विभागीय वितरण व्यवस्थापक आश्विनकुमार जंगम म्हणाले की, मरिनच्या आरोग्यदायी उत्पादनाचा नक्कीच फायदा होईल. यासाठी सर्व खेळाडूंना स्पर्धेदरम्यान हि उत्पादने देण्यात येणार आहेत.
सुरजित बंडोपाध्याय यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूला 100 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या खेळाडूला 60 आयटीएफ गुण देण्यात येणार आहेत. दुहेरीतील विजेत्यांना 75 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या 45आयटीएफ गुण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना सोमवार,दि.2 डिसेंबर या दिवशी सुरूवात होणार असून पात्रता फेरीचे सामने शनिवार व रविवार या दिवशी होणार आहेत.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले: पेटॉर्न हंचायकुल(थायलंड)118, देव जावीया(भारत)133, रोस्टीस्लाव गॅलफिंगर(कझाकस्तान)164, मथास मुसील(चेक प्रजाकसत्ताक)413, उदयवीर सिंग(भारत)441, दायसुके इनग्वा(जपान)476, आर्यन भाटिया(भारत)489, ड्रॅगोस पेट्री पोपेंगा(रोमानिया)502;
मुली: मारिया शोल्कोवा(रशिया)163, विपाशा मेहरा(भारत)171, लांलाना तारारुडी(थायलंड)172, यु-युन ली(तैपेई)244, इवा गर्त्सेवा(रशिया)247, सलकथीप ओनमूआंग(थायलंड)304, मै हासेगावा(जपान)317, चाओ यी वांग(तैपेई)323.