पुणे-क्रिएटिव्ह फौंडेशन आणि प्रसन्न पर्पल च्या वतीने प्रभाग १३ मधे अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.पुणे महापालिकेच्या स्वच्छता सेवकांना ( रस्ते व परिसर स्वच्छ करणाऱ्या ) तसेच घरोघरी कचरा वेचणाऱ्या *स्वच्छ च्या स्वच्छता सेवकांना आणि फांद्या झावळ्याचा कचरा गोळा करणारे उद्यान विभागाचे कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘माझा भाग स्वच्छ भाग ‘अशी स्पर्धा आयोजित करीत आहोत – दिनांक १ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान परीक्षकांमार्फत पाहणी करुन प्रत्येक भागाच्या स्वच्छतेचा आलेख तयार करुन त्याप्रमाणे गुण देण्यात येतील व त्या पाहणीनुसार प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षीसे विविध गटात दिली जातील.नागरिकांचा अभिप्राय देखील विचारात घेण्यात येइल.
प्रथम क्रमांक – घड्याळ
द्वितीय क्रमांक – मोबाईल
तृतीय क्रमांक – प्रवासी बॅग.
महिला सेविकांना प्रथम क्रमांक एक ग्रॅम सोन्याचा हार / द्वितीय क्रमांक पैठणी व तृतीय क्रमांक सोन्याची नथ अशी भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत.कालांतराने अशी स्पर्धा शहर पातळीवर घेण्याचा देखील मानस असून इंदूर च्या धर्तीवर पुणे ही देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहर ठरावे या भावनेने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे संदीप खर्डेकर आणि प्रसन्न पर्पल चे प्रसन्न पटवर्धन यांनी जाहीर केले.