पुनीत बालन ग्रुप संघाची विजयी सलामी
पुणे, 24 जानेवारी 2021: हेमंत पाटील ग्रुप यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एचपी रॉयल्स या संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदविला.
व्हिजन क्रिकेट मैदान, सिंहगड रोड व डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात किर्थी(19 धावा व 3-17)हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप संघाने वॉरियर्स स्पोर्ट्स संघाचा 9 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना पीबी ग्रुप संघाने 20षटकात 6 बाद 114धावा केल्या. यात शिल्पा साहूहिने संयमपूर्ण फलंदाजी करताना 45 चेंडूत 7 चौकरांच्या साहाय्याने 41 धावांची खेळी केली. शिल्पाला किर्थी 19, उत्कर्षा पवार 18 यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. वॉरियर्स स्पोर्ट्सकडून स्नेहल प्रधान(1-19), माया सोनावणे(1-26), संजना वाघमोडे(1-26) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉरियर्स स्पोर्ट्स संघाला 20षटकात 9 बाद105 धावाच करता आल्या. यामध्ये माया सोनावणे 22, सायली लोणकर 28,, तेजश्री ननावरे 19 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुनीत बालन ग्रुपकडून किर्थी हिने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही चमक दाखवत 17 धावात 3 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्वानंजली मुळ्ये 18धावात 2 गडी, तर आयुशी सोनीने 15 धावात 1 गडी बाद करून किर्थीला साथ दिली. सामन्याची मानकरी किर्थी ठरली.
दुसऱ्या सामन्यात ऋतुजा गिलबिले(52धावा),आदिती गायकवाड(44धावा) व अनुजा पाटील(26 धावा) यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर एचपी रॉयल्स संघाने आर्या स्पोर्ट्स संघाचा धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:पुनीत बालन ग्रुप: 20षटकात 6 बाद 114धावा(शिल्पा साहू 41(45, 7×4), किर्थी 19(34,2×4), उत्कर्षा पवार 18(9,3×4), स्नेहल प्रधान 1-19, माया सोनावणे 1-26, संजना वाघमोडे 1-26) वि.वि.वॉरियर्स स्पोर्ट्स: 20षटकात 9 बाद105 धावा(माया सोनावणे 22(28,1×4), सायली लोणकर 28(28,4×4), तेजश्री ननावरे 19(18, 2×4, 1×6), किर्थी 3-17, स्वानंजली मुळ्ये 2-18, आयुशी सोनी 1-15);सामनावीर-किर्थी; पीबी ग्रुप संघ 9 धावांनी विजयी;
एचपी रॉयल्स: 20 षटकात 5बाद 141(आदिती गायकवाड 44(48,6×4), ऋतुजा गिलबिले 52(43,6×4), अनुजा पाटील 26(18,5×4), गौतमी नाईक 1-32, मोना मेश्राम 1-18) वि.वि.आर्या स्पोर्ट्स: 20षटकात 5बाद 99धावा(अंबिका वाटाडे 32(51,4×4), किरण नवगिरे 35(37,4×4,1×6), मोना मेश्राम 13, पूनम खेमनार 2-12, अनुजा पाटील 1-18);सामनावीर-अनुजा पाटील; एचपी रॉयल्स संघ 42धावांनी विजयी.