पुणे-आज दि 23 फेब्रुवारी 2021 रोजी “ संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त “ स्वानंद आरोग्य कोटी सहकारनगर 2 येथे काँग्रेस गटनेते श्री.आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री. हेमंत आबा बागुल यांच्या हस्ते श्री.दिनेश सोनवणे(आरोग्य निरीक्षक), श्री. राजेंद्र जाधव (मुकदम),श्री.सुधीर आदमाने(सफाई सेवक),श्री.विकास पवार (बिगारी),श्री. कांतीलाल पवार (बिगारी),सौ.शकुंतला जाधव (बिगारी),सौ.सुनीता तरडे (बिगारी) आदींचा सत्कार शाल,श्रीफळ,झाडाचे रोप देऊन करण्यात आला .
संत गाडगे बाबा महाराज स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येते.
जिवावरती उदार होऊन करोनाच्या महामारीत देखील या सफाई कर्मचाऱ्यांनि आपले कर्तव्य बजावले.या सफाई कर्मचाऱ्यांचे आत्मविश्वास मनोबल उचवण्याकरिता हा उपक्रम घेतल्याचे श्री. हेमंत आबा बागुल म्हणाले
या प्रसंगी सहकार नगर भागातील श्री मिलींद देवळे (अध्यक्ष सूर्या सोसायटी),श्री. जयंत फाटक (अध्यक्ष भोसले पार्क) व,श्री महेश ढवळे, दीपक गावडे, त्रिंबक अवचिते, संतोष गायकवाड, सुयोग धाडवे, कुमार खटावकर , निखिल सोनवणे,योगेश निकाळजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.