पुणे- राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्ष पदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती केली आहे. आमदार चेतन तुपे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज प्रशांत जगताप यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जगताप यांना देण्यात आले. या वेळी सुभाष जगताप , विशाल तांबे,बाबुराव चांदेरे ,नंदा लोणकर आणि आ. चेतन तुपे उपस्थित होते.
कार्यकर्ता, पीएमटी सदस्य ,पीएमटी अध्यक्ष,नगरसेवक ते महापौर असा प्रवास असलेले जगताप यांच्या मातोश्री देखील राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत .