बारामती दि.१८ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामातीतील अंबिकानगर जळोची येथे बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी सभापती पंचायत समिती बारामती नीती फरांदे, एकात्मिक विकास समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, अंबिकानगर येथील परिसर सध्या वाढलेला आहे. या परिसरात मुलभूत सोयीसुविधा देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. नवीन सभामंडपामुळे अंबिकानगर येथील नागरिकांना विरंगुळा मिळू शकेल. सभामंडपात देण्यात आलेल्या वायफाय सेवेचा लाभ नागरिकांना घेता येईल. सभामंडपाचा आणि आपला परिसर नेहमी स्वच्छ आणि निटनेटका ठेवून ‘स्वच्छ बारामती हरित बारामती’ हे ब्रिद वाक्य खरे करावे. कचरा उचलण्यासाठी पियाजो कंपनीने बारामती नगरपरिषदेसाठी पाच इलेक्ट्रीक रिक्षा दिलेल्या आहेत त्याचा रहिवाशांनी उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे आणि आशा माने यांच्या कामाचे श्री.पवार यांनी कौतुक केले.कार्यक्रमाला ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव, नगरपरिषदेचे सदस्य अतुल बालगुडे आशा माने, अंबिकानगर जळोची येथील रहिवासी, पदाधिकारी व अधिकरी उपस्थित होते.