पुणे- केवळ महापौर मोहोळ यांच्या हट्टासाठी नायडू हॉस्पिटलचा बळी देऊ देणार नाही, आयुक्त साहेब , या महापौरांच्या तालावर नाचू नका ..असा सणसणीत इशारा कॉंग्रेसचे माजी गटनेते आणि नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दिला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महापालिकेने मेडिकल कॉलेज उभारावे याबाबतचा हट्ट जरूर पूर्ण करता येईल पण आत्ता ती वेळ नाही तरीही त्यासाठी आता ४०० कोटीच्या निविदेची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे . एकीकडे महापालिकेची आर्थिक अवस्था डबघाईला आल्याचे सांगटा आणि दुसरीकडे ४०० कोटीची टेंडर्स अशा काळात काढता ? शिवाय या कॉलेजसाठी नायडू हॉस्पिटलचा बळी द्यायला हि मंडळी निघाली आहे. अनेक सांसर्गिक रोगांच्या साथीत ,महामारीत नायडू हॉस्पिटलने पुणेकरांना साथ दिली आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा आसरा बनलेल्या नायडूचा असा कोणाच्या हट्टापायी आयुक्तांना आपण बळी देऊ देणार नाही अशी भूमिका पत्रकार परिषदेतून काल अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. प्रसंगी आपण कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नायडू हॉस्पिटल बचावो ची मोहीम सुरु करू असेही त्यांनी म्हटले आहे.