पुणे, 16 ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत संकेत चव्हाण(4-22) याने केलेल्या अचूक गोलंदाजीसह राजवर्धन उंडरे(नाबाद 64धावा) याने केलेल्या धावांच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाचा पराभव करून विजय मिळवला.
येवलेवाडी येथील ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी मैदानावरील सामन्यात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. क्लब महाराष्ट्राच्या संकेत चव्हाण(4-22), शुभम मेड(2-28), यश क्षीरसागर(1-7), अतुल विटकर 1-25)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाचा डाव 37.1षटकात सर्वबाद 140 धावावर संपुष्टात आला. यात प्रथमेश बाजारी नाबाद 39, प्रज्वल घोडके 26, वैभव पाटील 24, शिबे सैल 12, कन्हैया लड्डा 12 यांनी धावा केल्या.
याच्या उत्तरात हे आव्हान क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 28.2षटकात 5बाद 141 धावा करून पूर्ण केले. यात राजवर्धन उंडरेने 83 चेंडूत 7चौकार व 2षटकारासह नाबाद 64 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला आदिल अन्सारीने 20, शिवकुमार चुगने 18 धावा काढून साथ दिली. ब्रिलियंट्स स्पोर्ट्स अकादमी कडून प्रथमेश बाजारीने 34 धावात 5 गडी बाद केला. सामनावीर संकेत चव्हाण ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 37.1षटकात सर्वबाद 140 धावा(प्रथमेश बाजारी नाबाद 39(33,4×4,1×6), प्रज्वल घोडके 26(50), वैभव पाटील 24(28), शिबे सैल 12, कन्हैया लड्डा 12, संकेत चव्हाण 4-22, शुभम मेड 2-28, यश क्षीरसागर 1-7, अतुल विटकर 1-25) पराभूत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 28.2षटकात 5बाद 141 धावा(राजवर्धन उंडरे नाबाद 64(83,7×4,2×6), आदिल अन्सारी 20(30), शिवकुमार चुग 18, प्रथमेश बाजारी 5-34); सामनावीर-संकेत चव्हाण; क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 5 गडी राखून विजयी;