पुणे- पहिल्या वर्षाचा अनुभव गाठीस असतानाही त्यातच गैरव्यवहार करत दुसरी लाट थोपविण्याचेही प्रयत्न न करणाऱ्या सत्ताधारी भाजपचा कारभार पुण्यातील कोरोनाच्या थैमानाला जबाबदार आहे .प्रशासन आणि कधी कधी कधी महाविकास आघाडीनेही त्यांना साथ दिली कि काय असे वाटते असा आरोप आज मनसे चे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी येथे केला . ते म्हणाले ,गेल्या वर्षी कोरोनाला थोपविण्यासाठी ज्या ज्या लोकांनी महापालिकेला पूर्णतः साथ दिली त्यांना सताविण्याचा कारभार याच महापालिकेतून झाला .स्थायी समिती आणि महापौर यांनी प्रशासनाचे अनेक विषय गेल्या वर्षभरात धडाधड संमत केले मात्र तरीही त्यांना प्रशासाच्या कारभारावर अंकुश ठेवता आला नाही . कधी कधी तर असेही वाटले कि विरोधी पक्ष सुद्धा टू मारल्यासारखे कर मी रडल्या सारखे करतो हि भूमिका पत्करून महापलिकेत वावरला .एकूणच भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्या राजकारणात वर्षभर पुणेकर भरडला गेला हि मोठी शोकांतिका आहे. असे मोरे म्हणाले .