पुणे, 19 ऑक्टोबर 2021: डेक्कन जिमखाना टेनिस विभागातर्फे आयोजित अतुल रुणवाल मेमोरियल डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धेत 130 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे यांनी सांगितले की, क्लबचे सदस्य अरुण रुणवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले असून त्यांच्या स्मरणार्थ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच, हि स्पर्धा 40, 50, 60, 70 and 80 वर्षावरील पुरुष एकेरी व दुहेरी या गटात होणार आहे.
स्पर्धेसाठी धनंजय सुमंत यांची स्पर्धा संचालक म्हणून तर, तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.