पुणे- सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या झालेल्या जाळपोळीनंतर काल मंगळवारी सायंकाळी पर्वती परिसरातील दोन गटात झालेल्या वादाचे रूपांतर तुफान हाणामारी व चाकू हल्ल्यात झाले. यात असंख्य दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचे समजते आहे. दोन्हीही गट माघार घेत नसल्याने व राडेबाजी वाढत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला.
मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी पर्वतीतील स्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. आज तेथे शांततेचे वातावरण आहे. या राडेबाजीत एक राजकीय कार्यकर्ता आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.