विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) सद्य :स्थिती व उपाययोजना
दि. 10/04/2020
(संध्या 5.00 वाजेपर्यंत)
विभागातील 53 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी.
आज विभागात 15 नवीन रुग्णांचे निदान.
दि 09/04/2020 रोजी 3 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू.
विभागातील एकुण रुग्ण संख्या 261.
ॲक्टीव रुग्ण संख्या 182
आज विभागात 15 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 261 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण संख्या 182 आहे. विभागात कालच्या अहवालानंतर दि 09/04/2020 रोजी 3 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झालाआहे. अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यूंपैकी सर्व 3 जण पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत.
1) दि 09/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास उच्च रक्तदाब व मधुमेह होता.
2) दि 09/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिआ, मधुमेह विकार होता.
3) दि 09/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 44 वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिआ विकार होता.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4137 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 3755 चा अहवाल प्राप्त आहे. 382 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3494 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 261 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 23,63,202 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 97,06,804 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 772 व्यक्तीना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
आज विभागीय आयुक्त यांनी विभागातील पोलीस आयुक्त ,जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , महानगपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, सीव्हील सर्जन व
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत व्हीडीओ कॉन्फरन्सगींद्वारे सविस्तर चर्चा केली यामध्ये
1. कोरोना वैद्यकीय सुविधा
2. खाजगी हॉस्पीटलचा सहभाग
3. उपलब्ध क्वारंटाईन / आयासोलेशन सुवीधा
4. मृतदेह दहन / दफन
5. जीवनावश्यक वस्तू / वैद्यकीय उपकरणे/ औषध उत्पादन उद्योग सुरु असणेबाबत खात्री.
6. आरोग्य कर्मचारी / आशा वर्कर प्रशिक्षण , सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी उपलब्धता
7. बेघरांसाठीच्या सुविधा
8. सहकारी साखर कारखान्यांच्या मजुरांची व्यवस्था
9. अन्नधान्य / दूध / भाजीपाला पुरवठा स्थिती ,शिधापत्रिका नसलेल्यांसाठीची व्यवस्था
10. Community Kitchen व तयार अन्न वाटप व्यवस्था
11. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग व त्यांचे प्रश्न
12. मरकज / तबलीगींची शोध मोहीम
इत्यादी विषयांचा आढावा घेऊन महत्वपूर्ण सूचना केल्या .