अनिल भोसले व सतीश चव्हाण यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नती
पुणे – महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधीक्षक अभियंता अनिल भोसले व सतीश चव्हाण यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली आहे.
पुणे परिमंडलाच्या पायाभूत विकास आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल भोसले हे लातूर परिमंडल तर चाचणी व गुणवत्ता विभागाचे अधीक्षक अभियंता सतीश चव्हाण हे औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून रुजू होत आहेत.
अनिल भोसले इंदापूर तालुक्यातील मूळ रहिवासी असून त्यांनी तत्कालीन वीज मंडळ तसेच महावितरणमध्ये शिरुर, शिक्रापूर, नगररोड, मंचर, लातूर, सोलापूर, पुणे आदी ठिकाणी कनिष्ठ अभियंता ते अधीक्षक अभियंता या विविध पदांवर काम केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मूळ रहिवासी सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे उपकार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता या विविध पदांवर काम केले आहे. चव्हाण यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.