Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ज्येष्ठ आणि प्रख्यात साहित्यिक आनंद यादव यांचे निधन

Date:

पुणे – ज्येष्ठ आणि प्रख्यात  साहित्यिक आनंद यादव यांचे रविवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील धनकवडी येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत
आनंद यादव हे मुळचे कोल्हापूरचे आहे. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ मध्ये झाला होता. मराठीत त्यांनी विपूल प्रमाणात लेखन केले आहे.
यामध्ये काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.

आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोल करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.

प्रकाशित साहित्य

आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-

काव्यसंग्रह

हिरवे जग १९६०मळ्याची माती१९७८मायलेकरं (दी‍र्घकविता)१९८१

कथासंग्रह

खळाळ १९६७घरजावई १९७४माळावरची मैना १९७६आदिताल १९८०डवरणी (पुस्तक) १९८२उखडलेली झाडे १९८६

व्यक्तिचित्रे

मातीखालची माती (१९६५)

ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथसंपादन करा

स्पर्शकमळे (१९७८)पाणभवरे (१९८२)१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाहआत्मचरित्र मीमांसामराठी लघुनिबंधाचा इतिहासग्रामीणता : साहित्य आणि वास्तवग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्यामराठी साहित्य : समाज आणि संस्कृती

कादंबरी

गोतावळा १९७१नटरंग (पुस्तक) १९८०. या कादंबरीवर त्याच नावाचा मराठी चित्रपट निघाला.एकलकोंडा १९८०माऊली १९८५संतसूर्य तुकाराम

आत्मचरित्रात्मक

झोंबी १९८७. या कादंबरीवर लवकरच मराठी चित्रपट बनेल, अशी बातमी आहे.नांगरणी १९९०घरभिंती १९९२काचवेल

बालकथा

उगवती मने

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...