पुणे- जयपुर, राजस्थान येथे रविवार दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या ‘‘महागाई हटाव रॅली’’ साठी आज पुणे शहर व पुणे ग्रामीण महिला काँग्रेस कमिटीच्या महिला कार्यकर्त्या बसेस मधून काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथून रवाना झाल्या. शहर व ग्रामीणच्या एकूण १०० महिला या रॅलीस रवाना झाल्या आहेत. याचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी केले होते.
रॅलीस जाण्यासाठी महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील व आमदार कैलास थोपटे यांनी बसेसची व्यवस्था करून दिली आहे. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, हरजीतसिंग बेदी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळकर, सुनिल पंडित, नारायण पाटोळे आदी उपस्थित होते.

